Shani Margi 2022 Effect: ग्रहमंडळात शनिदेव न्यायाची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेवांचं गोचर म्हटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे इतर ग्रहांच्या गोचरापेक्षा शनि गोचर (Shani Rashi Parivartan) सर्वात महत्त्वाचा ठरतो. सध्या शनि देव स्वत:च्या मकर राशीत वक्री अवस्थेत आहेत. 23 ऑक्टोबर 2022 पासून शनिदेव मकर राशीतून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे पाच राशींना दिलासा मिळणार आहे. या राशीच्या लोकांची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या पाच राशी कोणत्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: शनि मार्गस्थ होताच मेष राशीच्या (Mesh Rashi) लोकांना यश मिळू लागेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यवसायात लाभ होईल. अचानक कुठून तरी पैसे मिळतील. समाजात मान सन्मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.


कर्क:  शनिदेवाच्या मार्गक्रमणामुळे कर्क राशीच्या (Kark Rashi) लोकांना आराम मिळेल. तणाव दूर होईल. नोकरी-व्यवसायात दिलासा मिळेल. धनलाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


तूळ: शनिच्या मार्गक्रमाणामुळे अडीचकीच्या प्रभावखाली असलेल्या तूळ राशीच्या (Tula Rashi) लोकांना मोठा दिलासा मिळेल. जी कामे आजवर विनाकारण रखडली होती, ती आपोआप पूर्ण होतील. आराम मिळेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक संकटातून दिलासा मिळेल.


ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत सूर्यग्रहण आणि ग्रहांचा विचित्र योग, या 6 राशींना होणार यातना!


वृश्चिक: शनीचं मार्गक्रमण वृश्चिक राशीला (Vrushchik Rashi) घर आणि वाहनात सुख देईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जुने प्रकरण निकाली काढता येईल. खरेदीत खर्च होईल पण आर्थिक स्थिती चांगली राहील.


मीन: शनि मार्गस्थ होत असल्यामुळे मीन राशीच्या (Meen Rashi) लोकांना खूप फायदा होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. पदोन्नती मिळू शकते. समाजात प्रभाव वाढेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)