Shani Gochar: पितृपक्षात शनी गोचर बदलणार `या` राशींचं नशीब; नोकरी व पैशाची गणितं सुटणार
Shani Gochar: पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
Shani Gochar: आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा आहेत. पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात जनावरांना चारा देणं खूप शुभ मानलं जाते. याशिवाय या महिन्यात ब्राह्मणांना दान करणं खूप चांगले मानलं. असंच या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
मेष रास
शनि गोचरमुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात खूप आनंदाचे वातावरण असेल. मेष राशीचे लोक या महिन्यात जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल. याशिवाय पितृ पक्षाचा महिना असल्याने पशु-पक्ष्यांना अन्नदान करणंही शुभ राहील. तुमच्या करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. परदेशात काम करतात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मालमत्ता किंवा रिअल इस्टेटशी संबंधित असाल तर ते विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
तूळ रास
पितृ पक्षाच्या महिन्यात तूळ राशीच्या लोकांसाठीही दिवस चांगला असणार आहे. या राशीचे लोक या महिन्यात काही नवीन काम सुरू करू शकतात. आर्थिक व सामाजिक लाभ होणार आहे. शनीच्या गोचरमुळे लोकांच्या जीवनात बदल होईल आणि त्यांचे जीवन आनंदी होईल. यावेळी ब्राह्मणांना दान करणे आणि पशु-पक्ष्यांना अन्न देणे चांगले मानले जाते. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
धनु रास
शनीच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांसाठीही काळ चांगला जाणार आहे. या राशीच्या लोकांनी गरिबांना दान दिल्यास शनिदेव त्यांच्यावर आशीर्वाद देतात. शनिदेवाच्या कृपेने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. पितृ पक्षात नवीन काहीही सुरू करू नये असं म्हटले जात असलं, तरी शनी गोचरात असेल तर आर्थिक आणि सामाजिक लाभ होईल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )