Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि राशींना विशेष महत्त्व आहे. त्यात शनी ग्रह हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे. शनिदेव ही न्यायाची देवता मानली जातो. आपले कर्म चांगले असतील तर शनिदेवला घाबरण्याची गरज नाही. त्याची आपल्यावर अपार कृपा राहते. पण जर तुम्ही वाईट कर्म केले असतील तर तुम्हाला शनिदेव शिक्षा देणार. कुंडलीत शनिदोष असल्यास शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती हा सर्वोत्तम दिवस आहे. यंदाची शनि जयंती 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Shani Jayanti 2023 these 5 zodiac signs get success and wealth)


कधी आहे शनि जयंती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि जयंती ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार 19 मे 2023 ला शनि जयंती आहे. 


'या' राशी होणार श्रीमंत?


वृषभ (Taurus)


या राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे शुक्र आणि शनि हे एकमेकांसाठी अनुकूल ग्रह आहेत. त्यामुळे शनि जयंतीला या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. आर्थिक लाभासोबत समाजात मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे.  


तूळ (Libra)


या राशीचा स्वामीदेखील शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शनि जयंती नशिबवान ठरणार आहे. अपाय यशासोबत भरपूर धनलाभ होणार आहे. समाज तुमची कीर्ती वाढणार आहे. कुटुंबातही सुख समृद्धीत वाढ होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसणार आहे. कुटुंबातील सदस्याकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. अचानक आर्थिक धनलाभ होणार आहे. 


कुंभ (Aquarius)


शनि जयंती ही कुंभ राशीच्या लोकांना सर्वाधिक फळ देणार आहे. कारण या राशीचा स्वामी शनि आहे. त्यात शनि सध्या कुंभ राशीत आहे, त्यामुळे या लोकांची साडेसाती सुरु आहे. या लोकांना शनि जयंतीला साडेसातीतून दिलासा मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. धनलाभ होण्याचा योग आहे. 
 


मकर (Capricorn)


शनि हा मकर राशीचाही स्वामी असल्याने या राशीच्या लोकांवर शनिची कृपा असणार आहे. शनि जयंती या लोकांसाठी प्रगतीचे मार्ग घेऊन येणार आहे. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. राजकारणातील लोकांनाही शनिदेवाचा आशिर्वाद मिळणार आहे.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)