कुंडलीत Shani - Mangal ची शुभ स्थिती असले तर क्षणात तुम्ही व्हाल श्रीमंत
Shani Mangal Yuti : कुंडलीती जेव्हा एखादा ग्रह शुभ स्थितीत असेल तर तुम्हाला धनलाभाचे योग असतात. पण जेव्हा क्रूर ग्रह नकारात्मक घरात असला तरी या स्थितीत राजादेखील गरीब होतो.
Shani Mangal Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांना विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील हे 9 ग्रह कुठल्या घरात विराजमान आहे. तिथे त्याची स्थिती कुठला योग तयार करत आहे. त्यावर जाचकाचा आयुष्यावर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होत असतो. अगदी त्याचा करिअर, वैवाहिक जीवन, संतान योग अगदी आर्थिक स्थिती ही या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. (shani mangal yuti mars and saturn conjunction effect horoscope astrology)
जर एखादा ग्रह शुभ घरात असेल तर त्या जाचकाला धनलाभसोबत समाजात मान सन्मान मिळतो. पण क्रूर ग्रह नकारात्मक घरात विराजमान असेल तर त्या श्रीमंत व्यक्तीलाही रंक बनतो. आज आपण अशाच दोन ग्रहांबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्यांना वैदिक ज्योतिषशास्त्रात क्रूर ग्रह म्हणून पाहिले जाते. शनि आणि मंगळ हे दोन ग्रह ज्योतिषशास्त्रात चांगले मानले जातं नाही. अशा स्थितीत शनि आणि मंगळ यांचा संयोग तुमच्या कुंडलीत असेल मग काय? आशावेळी त्या व्यक्तीला उच्च स्थान आणि मेहनती बनवते, मात्र त्याच वेळी त्याला काही अडचणींचाही सामना करावा लागतो.
कुंडलीतील पहिल्या घरात शनि - मंगळ युती
या व्यक्ती प्रत्येक कामात प्रामाणिक असतात. शिवाय ते त्यांचं काम वेळेत पूर्ण करतात. जर या लोकांचं काम वेळेत झालं नाही, अगदी नीट झालं नाही तर ते चिडचिड करतात, वैतागतात.
कुंडलीतील दुसऱ्या घरात शनि - मंगळ युती
या लोकांनी गुंतवणुकी करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. शिवाय बोलताना त्यांनी नम्रता ठेवावी. कारण या दोन ग्रहांच्या युतीमुळे तुम्ही कठोर होता. डोळ्यांचा समस्यांकडे लक्ष द्या. घरातील सदस्य तुमच्यावर नाराज असेल. पण दुसरीकडे आर्थिक समस्यावर तुम्ही मात करु शकणार आहेत.
हेसुद्धा वाचा - रुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता
कुंडलीतील तिसऱ्या घरात शनि - मंगळ युती
शनि मंगळ यांच्या युतीमुळे या लोकांचं लहान भावाशी काही खास नातं नसतं. ही लोक त्यांच्या समाजिक वर्तुळात चांगले असतात. मात्र ते ज्या व्यक्तींवर आधार असतात त्यांच्याकडून हवं तसं काम होतं नसल्याने ते नाराज राहतात. ही लोक कामात उत्तम असल्याने कायम चर्चेत असतात. या लोकांना खांदे दुखीचा त्रास होऊ शकतो.
हेसुद्धा वाचा - Rajadhiraja Yoga : रंकाचाही राजा करतो 'हा' अद्भूत योग; पाहा तुमच्या पत्रिकेत आहे का?
कुंडलीतील चौथ्या घरात शनि - मंगळ युती
ही लोक आईपासून दूर असतात किंवा आईचे बोलणं या लोकांना फारसे आवडत नाही. तुमच्या आईला बीपी, हाडे आणि सांधे यांच्याशी संबंधित आजार असू शकतो. ही लोक कामाच्या बाबातीत प्रामाणिक असतात. मात्र वडिलोपार्जित मालमत्तेबाबत अडचणींना सामोरं जावं लागतं.