Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. शनिदेव 17 जानेवारी 2023 पर्यंत अशा स्थितीत असणार आहे. त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करतील. पण 17 जानेवारी 2023 पर्यंत शनिदेव मार्गस्थ झाल्याने पाच राशींना गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाच राशी कोणत्या आहेत आणि या दरम्यान काय उपाय करायला हवेत, जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : शनिदेव मार्गस्थ झाल्याने वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. या काळात प्रत्येक कामात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चात देखील वाढ होऊ शकते.


कर्क : शनिदेव मार्गस्थ झाल्याने कर्क राशीच्या लोकांना जीवनात अनेक समस्या येतील. नोकरी-व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात. या काळात आर्थिक अडचण वाढेल आणि  उत्पन्न कमी होईल. आपल्या बोलण्याने मन दुखू शकतं म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


कन्या : या काळात मार्गस्थ शनि अडचणीत वाढ करेल. कामे न झाल्याने निराशा येऊ शकते. अचानक अडथळे वाढतील. या काळात आरोग्याची काळजी घ्या. घरात वाद होऊ शकतात.


मकर : मकर राशीतच शनि मार्गस्थ झाला आहे. या राशीवर शनिची साडेसातीही सुरू आहे. या लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. 


लक्ष्मी तोडगा! दिवाळीला काळी हळद आणि चांदीचं नाणं यांचा करा उपाय, आर्थिक अडचण होईल दूर


कुंभ : शनि मार्गस्थ झाल्याने कुंभ राशीच्या लोकांना त्रास देईल. आरोग्याची चांगली काळजी घ्या. करिअरमध्ये चढउतार येऊ शकतात. विशेषतः इतरांच्या व्यवहारात अजिबात पडू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.


शनिदेवाचा प्रभाव कमी करण्याचे उपाय


शनि मार्गस्थ होताच ज्या राशींना त्रास होणार आहे. त्यांनी काही उपाय करावेत. या उपयांमुळे शनिदेवांचा त्रास कमी होऊ शकतो.


  • शनिवारी शनि मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करा.

  • पितळेच्या भांड्यात तेल घेऊन तुमचा चेहरा पाहा आणि नंतर वाडग्यासह तेल दान करा. शनिमंदिरात तेल ठेवून येऊ शकता.

  • प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

  • शनिवारी हनुमानजींची पूजा करा.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)