Shani Margi : नोव्हेंबरनंतर शनी मार्गी चमकविणार `या` 4 राशींचं भाग्य, जून 2024 पर्यंत यश-अपार संपत्ती
Saturn Direct : कर्मदाता, न्यायदेवता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनि विरुद्ध दिशेने भम्रण करत आहे. लवकरच तो मार्गी होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं भाग्य पुन्हा उजळून निघणार आहे.
Saturn Direct : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा ग्रह सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदल असतो. शनी जेव्हा कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा तो सुमारे अडीच वर्ष तो त्या राशीत विराजमान असतो. शनि प्रतिगामी अवस्थेतून प्रत्यक्ष अवस्थेत येत आहे. शनीदेवाची वक्र स्थिती 4 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर शनि मार्गी (Shani Margi 2023) होणार आहे. काही राशींसाठी शनिदेवाची मार्गी स्थिती अशुभ असू शकते. मात्र काही राशींच्या लोकांसाठी तो अतिशय (Kumbh Rashi Positive Impact) भाग्यशाली ठरणार आहे. 4 राशींच्या लोकांसाठी शनिदेवाची मार्गी स्थिती नशिब पालटणारी ठरणार आहे. 30 जून 2024 पर्यंत या राशींच्या लोकांची दिवाळी असणार आहे. (shani margi in kumbh rashi positive impact till november direct saturn open doors 4 lucky zodiac signs)
'या' राशींचं भाग्य उजळणार !
कुंभ (Aquarius Zodiac)
ज्योतिषशास्त्रीयनुसार, कुंभ राशीतील शनीचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये यश आणि धनलाभ होणार असल्याने यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 2024 पर्यंत तुम्हाला नोकरीत भरपूर यश मिळणार असून पगार वाढ होणार आहे. त्याशिवाय गुंतवणुकीतून तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कार्यक्षेत्रात नवीन नवीन गोष्टी तुम्ही करणार आहात. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी बदल किंवा करिअरमध्ये बदल करायचा असेल तर हा काळ उत्तम असणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ नफा घेऊन आला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश दोन्हीचा मेळ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होणार आहे. या काळात कुटुंबाची तुम्हाला साथ मिळणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठीही हा काळ शुभदायी असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं फळ मिळणार आहे. एवढंच नाही तर व्यवसायात चांगला नफा मिळविण्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या भविष्यातील सर्व योजनेत यश प्राप्त होणार आहे. या काळात वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. नोकरीत पदोन्नतीही मिळणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
शनि प्रत्यक्ष असल्यामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगतीची होणार आहे. अचानक आर्थिक लाभाच्या अनेक संधी चालून येणार आहेत. नोकरदारांना बढतीची चांगली तुमचा दिवस बनवणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफा या काळात मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)