Shani Nakshatra Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठारविक वेळी राशीमध्ये बदल करतो. याचप्रमाणे ग्रह त्यांच्या नक्षत्रात देखील बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शनिदेव सध्या वक्री अवस्थेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच शनीदेवांनी 22 ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय. या ठिकाणी ते 15 ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहणार आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण अशा 3 राशी आहेत, ज्यांना यावेळी शनिदेवाच्या आशीर्वादाने खूप फायदा होणार आहे. जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र गोचरने कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहुयात.


मिथुन रास


शतभिषा नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. या काळात तुम्ही केलेले सर्व प्रवास यशस्वी होतील. तुमच्या साहस आणि शौर्यामध्येही वाढ होईल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. व्यापारात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल.


मेष रास 


शनिदेवाचा शतभिषा नक्षत्रात झालेला प्रवेश तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. जर तुम्ही व्यापारी असाल तर या काळात तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या बळावर अनेक कामं पार पाडाल. स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत ते याचा विचार करू शकतात. 


सिंह रास


शतभिषा नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकणार आहे. तसंच या काळात नोकरी-व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरदार लोकांना या काळात करिअरच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )