Shani Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला क्रूर ग्रह असं म्हटलं जातं. सूर्यपुत्र शनि हा कर्माचा दाता मानला जातो. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनिदेवाचं गोचर शतभिषा नक्षत्रात झालं असून ते 17 ऑक्टोबरपर्यंत हे राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही राशीच्या व्यक्तींना शनी नक्षत्र बदलल्याने फायदा होणार आहे. जाणून घेऊया शनी नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. यामध्ये तुमची रास आहे का हे देखील पाहा.


मेष रास


या राशीच्या व्यक्तींचा 7 महिन्यांचा काळ खूप चांगला असणार आहे. कोणतंही नवं काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. जे लोक आधीपासून व्यवसाय तसंच नोकरी क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. 


मिथुन रास


या राशीच्या व्यक्ती नोकरी किंवा अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ मिळणार आहे. करिअरसाठीही हा काळ अतिशय योग्य आहे. 


सिंह रास


शतभिषा नक्षत्रात शनीचं परिवर्तन सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश, नोकरीत बदल होऊ शकतात. व्यवसायामध्ये तुमची चांगली प्रगती होणार आहे. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची चिन्ह आहे.


तूळ रास


या नक्षत्र बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रगतीची चांगली संधी मिळेल. व्यावसायिकांना मोठा पैसा मिळू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढणार आहेत.


धनु रास


धनु राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन चांगले परिणाम देणार आहे. तुम्ही जे काम करणार आहात त्यामध्ये यश मिळू शकेल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकणार आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच इच्छित नोकरी मिळेल. 
 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)