Shani Rahu Yuti Effect : श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास आला असून त्यासोबत अनेक शुभ अशुभ योग जुळून आले आहेत. लक्ष्मी नारायण राजयोग, खप्पर योग असे अनेक योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नियमित वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. सोबतच नक्षत्रदेखील आपलं स्थान बदलत असतात. अधिक मासात नक्षत्र गोचराने शनी आणि राहु यांच्यातून एक योग तयार झाला आहे. नवग्रहांचा न्यायाधीश शनी शततारका नक्षत्र गोचर करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. या नक्षत्रात 17 ऑक्टोबरपर्यंत तो विराजमान असणार आहे. त्यामुळे 17 ऑक्टोबरपर्यंत 5 राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मात्र 17 ऑक्टोबरपर्यंत या राशीचे अच्छे दिन येणार आहे. (shani rahu yuti 2023 negative effect 5 zodiac signs till 17 october astrology news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा ढैय्याचा काळ असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची समस्या निर्माण होईल. खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय त्रासदायक असणार आहे. या लोकांनी 17 ऑक्टोबरपर्यंत कुठलीही गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारात करु नयेत. 17 ऑक्टोबरनंतर या लोकांचे चांगले दिवस येणार आहेत. आर्थिक स्थितीही तुमची सुधारेल. 


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीचा स्वामी शनि असून तो शनि सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे अशा स्थितीत अहंकाराची भावना तयार झाल्यामुळे त्यांना तो त्रासदायक ठरणार आहे. जोडीदारासोबत या काळात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कौटुंबिक शांतता भंग होणार आहे. 17 ऑक्टोबरनंतर तुमची स्थिती हळूहळू बदलेल. अगदी खासगी आयुष्यातही बदल दिसून येतील. तुमच्या जोडीदारासोबत नातं छान होईल. घरात आनंदी वातावरण असेल. 


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण संकटाचा काळ घेऊन आला आहे. ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांना आरोग्याची समस्या सतावणार आहे. पाय आणि गुडघ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. अनावश्यक खर्च या काळात वाढणार आहेत. त्यामुळे तुमची आर्थिकस्थिती बिघडणार आहे. 17 ऑक्टोबरनंतर सर्व परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. तुमची प्रकृती सुधारणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागेल. 


 कन्या (Virgo)


या काळात कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात वादळ येणार आहे. मानसिक गोंधळ आणि उलथापालथ तुमच्या आयुष्यात अस्वस्थ करणारी असेल. या काळात कोणताही निर्णय विचार न करता घेऊ नका. कष्ट करुनही तुम्हाला हवं तसं यश या काळात मिळणार नाही. घरगुती खर्चामुळे तुमच्यावर कर्ज काढण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. 17 ऑक्टोबरनंतर शक्य तितकी प्रत्येक गोष्टीत काळजी घ्या. ऑक्टोबरनंतर तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुमच्या मेहनतीचं फळंही तुम्हाला मिळेल. 


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात आरोग्याची समस्या उद्ध्भवणार आहे. या काळात तुमचं सरकारी अधिकाऱ्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला व्याजासह परत करण्याची वेळ येणार आहे. लव्ह लाइफमध्येही संकट येणार आहे. नातेसंबंधात काळजी घ्या अन्यथा ते तुटण्याची भीती आहे. वाहन चालवतानाही या काळात विशेष काळजी घ्या. 17 ऑक्टोबरनंतर शनी आणि राहूचं प्रभाव कमी होईल आणि परिस्थिती बदलेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )