Shani Gochar 2022: शनीचा कुंभ राशीत आज प्रवेश, 3 राशींचं बदलणार भाग्य
शनीचा 3 राशींना मोठा फायदा....सन्मान, पैसा आणि खूप काही, पाहा यामध्ये तुमची रास आहे का?
मुंबई : शनी गोचरचं ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे. अडीच वर्षांत शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 29 एप्रिल रोजी शनी स्वतःची रास मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करत आहे.
30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत येत आहे. ज्याचा 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल असं सांगितलं जातं. दुसरीकडे, 3 राशीच्या लोकांसाठी शनी संक्रमण भाग्यवान ठरू शकतो. या लोकांच्या मागची साडेसाती दूर होईल आणि भाग्य बदलेल.
30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा जगभरातील लोकांवर परिणाम होणार आहे. खोट बोलणारे, भ्रष्टाचारी आणि वाईट विचार करणाऱ्या लोकांना कोर्ट कचेऱ्यांच्या समस्या जाणवू शकतात. याशिवाय महागाईच्या समस्या जाणवतील. तर 3 राशींचं भाग्य उजळणार आहे.
या राशींचं भाग्य बदलणार
मेष : या राशीच्या व्यक्तींना प्रगतीची मोठी संधी आहे. पैसा आणि सन्मान दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळतील. काही जुन्या इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस आहे. संतान प्राप्तीसाठी शुभ योग आहे. कर्मचाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे.
या राशीच्या लोकांनी केवळ एक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांनी येणाऱ्या काळात आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. कोणतीही हयगय करू नका. आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे.
वृषभ : शनी गोचर योग या राशीसाठी सकारात्मक आणि लाभदायी असेल. लग्नाचा राजयोग आहे. करिअरमध्ये भाग्य बदलणार आहे. खूप जास्त प्रगती होईल भाग्य उजळेल. मोठा फायदा होऊ शकतो. मान-सन्मान, प्रतिष्ठा पद मिळेल. मात्र डोक्यावर खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल.
मिथुन : मिथुन लग्न राशी असणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. जुन्या आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. प्रत्येक कामात आपलं नशीब उजळणार आहे. कामाच्या क्षेत्रात मोठे बदल होऊ शकतात. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. वडिलांशी कारणाशिवाय भांडू नका त्यामुळे मनस्ताप वाढेल.
(Disclaimer : वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)