shani sadesaati upay: ज्योतिषानुसार शनि ग्रह हा न्यायाचा कारक मानला जातो. शनिदेवाचे नाव ऐकून बरेचदा लोक घाबरतात, परंतु तुम्हाला शनिदेवची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण ते प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देतात. जे अयोग्य कर्म करतात त्यांना शनिदेव शिक्षा करतात, परंतु त्याची कृपा सदैव चांगली कामे करणाऱ्यांवर असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिची स्थिती खराब असेल तर यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात बराच त्रास सहन करावा लागतो परंतु कुंडलीनुसार शनि काही लोकांसाठी शुभ मानला जातो.


काही लोकांसाठी शनीची साडे-साती शुभ देखील मानली जाते. आज आम्ही तुम्हाला शनिदेव कसा न्यायनिवाडा करतात आणि त्यांच्या साडे-सातीचा एखाद्यावर कसा परिणाम होतो? याबद्दल माहिती देणार आहोत.


कोणत्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात प्रसन्न ते जाणून घ्या- ज्योतिषशास्त्रानुसार, कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने यश मिळवणारे लोक, स्वावलंबी लोक, अशा लोकांवर शनिदेवाची कृपा कायम राहते.


बर्‍याच वेळा असे घडते की जरी कुटुंब भरलेले असले तरी एखाद्या व्यक्तीला एकटे वाटू लागते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले आहे की शनिदेव या लोकांना सर्व प्रकारच्या गोंधळापासून दूर ठेवू इच्छित आहेत, जेणेकरून त्यांना नात्याबद्दलचे सत्य योग्य प्रकारे समजू शकेल.


ज्यांना लोभ, क पट, फसवणूक इत्यादी गोष्टी आवडत नाहीत त्यांच्यावर भगवान शनीची कृपा आहे. ज्यांनी न्याय आणि सत्याचे समर्थन केले त्यांच्यावर शनिचे आशीर्वाद कायमस्वरूपी आहेत.


ज्योतिषानुसार जर एखाद्या व्यक्तीवर शनीची कृपा असेल तर बहुतेकदा त्या व्यक्तीला आयुष्यात 35 वर्षी किंवा त्यानंतर यश मिळते.


जे लोक आपल्या पालकांचा आदर करीत नाहीत त्यांना शनिदेव शिक्षा करतात. जे लोक नेहमीच चुकीच्या बाजूने असतात त्यांना शनिदेवच्या शिक्षेचा सामना करावा लागतो.


जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेवचा आशीर्वाद असेल तर ती व्यक्ती कोणत्याही अडचणीत अडकल्यानंतरही सहज बाहेर पडते. जर या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल तरिही त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.


ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव जे लोक हनुमानाची उपासना करतात त्यांच्यावर सदैव प्रसन्न असतात. जे लोक हनुमानची उपासना करतात त्यांच्यावर शनिचा वाईट प्रभाव पडत नाही.


ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हणतात की जर शनिदेवचा एखाद्या व्यक्तीवर वाईट प्रभाव पडत असेल तर हनुमानची उपासना केल्यास शनिचा वाईट प्रभाव कमी होतो. हनुमानच्या कृपेने त्या व्यक्तीला प्रायश्चित करण्याची संधी मिळते.


तुम्हाला शनिदेवची कृपा प्राप्त करायची असेल तर आपले कर्म नेहमी योग्य ठेवा. जर आपले कर्म चांगले असतील तर शनिच्या वाईट प्रभाव पडला तरीही त्याने फारसे नुकसान होणार नाही.