Saturn Rise 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्ह राशी परिवर्तन करतात, तर काही ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. ज्यावेळी एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याची शक्ती कमकुवत होते असं मानलं जातं. याच उलट ज्यावेळी ग्रहाचा उद होतो तेव्हा पुन्हा त्याच्या पूर्ण ताकदीकडे परत येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा ग्रह अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनी बराच काळ सुप्त अवस्थेत होता. आता शनी देवांचा उदय झाला असून आता ते त्यांच्या संपूर्ण ताकदीने लोकांना सकारात्मक परिणाम देणार आहेत. 15 ऑगस्ट 2023 रोजी शनीदेव त्यांच्या उदय जागृत अवस्थेत आले आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसत असला तरी शनीची 4 राशींवर शुभ स्थिती असणार आहे. जाणून घेऊया शनी देवाच्या उदयामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.


तूळ रास 


शनिदेवाची ही स्थिती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देणारी असणार आहे. या राशीच्या लोकांना शनी सर्व सुखसोयींची साधनं देणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे.  आर्थिक स्थिती चांगली राहील आणि समाजात मान-सन्मान वाढणार आहे. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळू शकणार आहे.


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं जाग्रत होणं शुभ राहणार आहे. या काळात सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. बेरोजगार लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल.


वृषभ रास


जागृत शनी या राशीच्या लोकांची सर्व कामे पूर्ण करणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. या काळात रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात.तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळणार असून तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसंच तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.


मिथुन रास


जागृत शनी मिथुन राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. या काळात या राशींच्या लोकांचं नशीब चमकणार आहे. काही मोठी इच्छा पूर्ण होईल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. कोर्ट- कोर्टातील प्रकरणे सोडवता येणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )