शनीदेव वक्रीमुळे केंद्र त्रिकोणाचा राजयोग; `या` राशींना प्रचंड धनलाभ
Shani Vakri 2023 : कर्म आणि न्यायदेवता शनीदेवाच्या हालचालीने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. लवकरच शनीदेव वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती मिळणार आहे.
Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. अशावेळी ग्रहांचा उदय किंवा अस्तमुळे काही अशुभ तर काही शुभ योग तयार होता. ग्रह गोचर, ग्रहांचा उदय आणि ग्रहांचा अस्त यामुळे काही राशींवर त्याचा सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात शनीदेव हा कर्म आणि न्यायदेवता मानला जातो. कारण तो आपल्याला कर्माची शिक्षा देतो असं म्हटलं जातं.
त्यामुळे शनी वक्री कधी ( shani vakri 2023 dates) आहे याबद्दल सगळ्या जाचकांना उत्सुकता आहे. यावर्षी शनिदेव 17 जून 2023 ला वक्री होणार आहे. त्यामुळे शनिचा केंद्र राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींवर अपार धनसंपदा प्राप्त होणार आहे. (shani vakri 2023 dates Kendra Trikon Rajyog vakri shani effects These Zodiac Signs get Money astrology news in marathi)
वृषभ (Taurus)
शनिदेवाच्या उलट वक्रीस्थितीमुळे तयार होणाऱ्या केंद्र राजयोगमुळे या राशीच्या लोकांना जबरदस्त धनलाभ होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. 17 जूनपासून या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडणार आहेत. मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून आले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरणार आहे. बोनस, सॅलरी वाढणार आहे आणि प्रमोशन होण्याचा युग आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला देण्यात येणार आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या उलट वक्रीस्थिती सर्वात जास्त शुभदायक ठरणार आहे. कारण या राशीच्या लोकांच्या कुंडलीत केंद्र राजयोग आणि शश राजयोग असे दुहेरी योग तयार होणार आहेत. या राशींच्या लोकांना 17 जूननंतर वेगवेगळ्या मार्गांनी धनलाभ होणार आहे. व्यवसाय आणि नोकरदार वर्गासाठी हा सर्वात उत्तम काळ असणार आहे. प्रवासातूनही तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. नवीन लोकांशी ओळखी होणार आहेत. या राजयोगामुळे अगदी तुमच्या जोडीदाराच्या सुद्धा प्रगतीचे शुभ योग आहेत.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या उलट वक्रीस्थितीमुळे तयार होणाऱ्या केंद्र राजयोग हा अतिशय लाभदायक ठरणार आहे. यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. प्रवासातून नवीन संधी आणि नवीन ओळखी ही भविष्यात खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा हा सर्वाधिक शुभ योग आहे.