शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग
Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे.
Shani Vakri 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवाता जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा अनेक राशींवर त्यांचा परिणाम होतो. शनी ग्रह हा जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. त्यामुळे कुंडलीतील शनीची स्थिती ही खूप महत्त्वाची असते. कुंडलीतील शनी चांगल्या स्थितीत नसल्या तर जाचकाला त्याचा अतिशय त्रास होतो. सध्या शनी देव 30 वर्षांनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहेत. (Shani Vakri 2023 in kumbh 3 zodiac signs people successful and money till 3 november 2023)
त्यात शनि 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. त्यामुळे याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी शनी वक्री शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. पण 12 राशींपैकी 3 राशींसाठी नोव्हेंबरपर्यंत चोहूबाजूने पैसे गोळा करण्याची संधी आहे. ही लोक शनि वक्री स्थितीमुळे अपार धन, यश कमावणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते नशिबान लोकं
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांचं नशिब शनी वक्रीमुळे पालटणार आहे. आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडणार आहेत. प्रत्येक कामात यश मिळत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तुम्ही खूप प्रगती करणार आहेत. प्रगतीचा शिखरावर पोहोचत असल्याने तुम्हालाही विश्वास बसणार नाही. तुम्हाला अनेक संधी मिळणार आहेत. करिअरमध्येही मोठी पोस्ट आणि सॅलरी वाढणार आहे. त्यामुळे बँक खात्यात पैसांच्या पाऊस येणार आहे. अचानक आर्थिक स्थिती मजबूत घरात गेल्यामुळे तुमच्या आत्मविश्वास द्वैगुणीत होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.
तूळ (Libra)
शनि वक्री तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद घेऊन येणार आहे. नोकरी व्यवसायात मोठी संधीसोबत यशाची पायरी चढणारी तुमची प्रगती असणार आहे. नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिक लाभामुळे तुम्ही घर किंवा कार खरेदीचा विचार करणार आहात. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. आलेला पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवल्यास भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
मकर (Capricorn)
शनी वक्रीमुळे मकर राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले काम सहज मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त व्हाल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होणार असून मेहनतीचं फळ मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी आणि प्रसन्न असणार आहे. नोव्हेंबरपर्यंत तुमचं आयुष्य नवीन रुपाने आणि परिपूर्ण होणार आहे.
हेसुद्धा वाचा - Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला 3 राशींवर बरसणार नारायणाचा आशीर्वाद
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)