Saturn Retrograde 2023 : शनिदेवाची बदलती चाल ही सर्व राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाची आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये, शनी हा एक अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो. ज्यावेळी शनीदेव त्याच्या हालचाली बदलतात तेव्हा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. 17 जून रोजी शनी वक्री झाले आहेत. 4 नोव्हेंबरपर्यंत ते या स्थितीत राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शनीदेवांच्या वक्री स्थितीचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


तूळ रास


या काळात तूळ राशीच्या लोकांनी मानसिक ताण अजिबात घेऊ नये. एखाद्या अज्ञात गोष्टीची भीती तुमच्याभोवती असणार आहे. वैवाहिक जीवनात काही तणाव असू शकतो. घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा. कुटुंबातील छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद घालू नका. काही परिस्थिती अशी येऊ शकते की, कुटुंबात विघटन होईल. जोडीदार तुमचं मन दुखावू शकतो. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या लोकांनी कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा. जर वडिलाचं तुम्ही ऐकत नसाल तर ते खूप रागावू शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आईला आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्धवण्याची शक्यता आहे. तुम्ही अज्ञात व्यक्तीकडून फसवले जाऊ शकता. कोणालाही न सांगता गुपित काम करू नका. मुलांच्या करिअरसाठी काही समस्या येणार आहेत. नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी थोडे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.


धनू रास


धनु राशीच्या लोकांनी कुटुंबात अनावश्यक भाष्य टाळालं पाहिजे. कौटुंबिक परिस्थितीत विनाकारण वाद-विवाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोणलाही न सांगता निर्णय़ घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वातावरण हानिकारक असू शकते. वैवाहिक जीवनाचा प्रश्न असेल तर पत्नीसोबत भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या जोडीदारावर रागावू नका. गाडी किंवा स्कूटर चालवताना काळजी घ्यावी. कोणत्या व्यक्तींशी काही मतभेद असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )