Shani Vakri Gochar 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, शनि ग्रहाची चाल ही फार महत्त्वाची मानली जाते. शनिदेव येत्या 17 जून 2023 रोजी रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहेत.  4 नोव्हेंबर पर्यंत शनिदेव वक्री अवस्थेत राहणार आहेत. मुळात शनि देव ज्यांच्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतात असं मानलं जातं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीची वक्री गती ही यावेळी 4 राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 12 राशींपैकी 4 राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याची चिन्ह आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या 4 राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्या सुख-सुविधा येणार आहेत.


सिंह रास


शनीच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांचे अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेमध्ये चांगलं यश संपादन करण्यास मदत मिळणार आहे. तसंच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. पैशांशी निगडीत गोष्टींमध्ये तुमचं नशीब चमकेल. पैसे कमवण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. 


धनु रास


शनीची वक्री गतीमुळे धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले दिवस घेऊन येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर तुम्हाला विविध प्रकारचे लाभ मिळू शकणार आहे. जी काही महत्त्वाची आणि रखडेलेली कामं असतील ती पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल.


मकर रास


शनि वक्रीमुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नांदणार आहे. या काळामध्ये तुमचं मन प्रसन्न असणार आहे. यापूर्वी जर तुम्हाला पैशांची चणचण भासली असेल तर ती भासणार नाही. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचाही विचार करू शकता. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. 


मीन रास


या राशीच्या व्यक्तींनाही या काळात बराच फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारच चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात. परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. याशिवाय तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होणार असून त्यातून तुम्हाला बराच पैसा मिळणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)