Shani Vakri In Makar Rashi: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव एखाद्या व्यक्तीच्या राशीत गोचर करून आले की, जातकांना घाम फुटतो. कारण या कालावधीत शनिदेव जमिनीवर आणतात. त्यामुळे शनिदेव आपल्या राशीला आले की आले, घडामोडी झपाट्याने घडू लागतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. शनिदेव धीम्या गतीने गोचर करतात आणि अडीच वर्षानंतर बदलतात. या काळात कर्मानुसार फळ देतात. तसेच शनि गोचराचा सर्व 12 राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडतो. शनिदेव सध्या मकर राशीत वक्री आहेत. 23 ऑक्टोबरपर्यंत शनि मकर राशीत वक्री अवस्थेत असतील. यानंतर जानेवारीमध्ये शनि मार्गस्थ होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: शनिदेव स्वतःच्यामकर राशीत वक्री असल्याने मेष राशींच्या जातकांसाठी फायदेशीर आहे. 23 ऑक्‍टोबरपर्यंत शनीच्या वक्री अवस्थेत या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल आणि यश मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायाचा विस्तार होईल. 


धनु: 23 ऑक्टोबरपर्यंत शनीची वक्री स्थिती धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. व्यवसायात नफा वाढेल. पगार वाढ तसेच प्रमोशन मिळू शकते. शेअर बाजारातून फायदा होऊ शकतो. तसेच वकृत्वाच्या जोरावर काम केले जाईल. गाडी चालवताना फक्त काळजी घ्या.


मीन : मीन राशीच्या लोकांना वक्री शनि खूप लाभ देईल. या जातकांना पैशाच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते. म्हणजेच, उत्पन्नात वाढ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होईल. व्यावसायिकांचा नफा आणि व्यवसायात वाढ होईल. कमाईचे नवीन मार्ग तयार होतील. मोठा करार अंतिम असू शकतो. गुंतवणुकीतून लाभ होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)