Shani Amavasya 2023 Rashifa :  प्रत्येक महिन्यात एक अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येतं असते, हे प्रत्येकाला माहिती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्याची 15 वी तिथी असते. हिंदू पंचांगानुसार 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 8:20 वाजता शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनी गोचर मुळे मीन राशींच्या लोकांना साडेसाती आणि कर्क आणि वृश्चिक राशींच्या लोकांवर कुंभ राशीत शनीची सती सुरू झाली आहे. यासह कुंभ राशीच्या लोकांसाठी साडे सतीचा दुसरा टप्पा तर मकर राशीच्या लोकांसाठी साडेसतीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी आजची अमवस्या खास आहे. शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. (shanichari amavasya 2023 Rashifa upay 5 zodiac signs must do this totke on mauni amavasya marathi news)


ग्रहांची स्थिती जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहू हा सध्या मेष राशीत आहे. मंगळ वृषभ राशीत, केतू तूळ राशीत, बुध आणि चंद्र धनु राशीत, शुक्र आणि सूर्य मकर राशीत आहे. तर शनि सध्या कुंभ राशीत असून हे शास्त्रात शुभ संकेत मानलं जातं. 



शनिदोषापासून सुटका करण्याचे सोपे उपाय 


सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. 


शनिदेवाला तेल अपर्ण करा.


पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करुन सात परिक्रमा घाला. 


दर शनिवारी सकाळी आंघोळ करुन तेलाचं दान करा. 


हनुमानजींना सिंदूर आणि चमेली अर्पण करा. 


शनि चालिसाचं पठण करा. 



शनिदेवाच्या सती आणि धैयापासून सुटकेसाठी उपाय


शनिदेवाची उपासना करा आणि रक्षास्त्रोत पठण करा. ज्यांच्या कुंडलीत साडेसात वर्षे चालू आहेत त्यांनी हे उपाय नक्की करा. 


या दिवशी गुळापासून बनवलेल्या वस्तूंचं दान केल्याने साडे सतीच्या प्रकोपापासून तुमचं रक्षण होईल. 


शनीच्या महादशापासून आराम मिळविण्यासाठी शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून शनीला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करा. 


शनि अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या. 


ज्योतिषशास्त्रानुसार पितरांच्या शांतीसाठी शनि अमावस्येला कावळ्यांना अन्नदान करणे पुण्यकारक मानलं जातं. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)