Shanidev Ko Prasan Kaise karein : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाने हे वर्ष भरभराटीचं आणि आनंदात जावं यासाठी अनेक संकल्प केले आहेत. काही लोकांना आरोग्यासाठी व्यायाम किंवा योगा करायचा संकल्प केला आहे. तर कोणी देवदर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. जर तुमच्यावर आर्थिक संकट कोसळलं असेल तर तुम्ही शनिदेवा प्रसन्न करण्यासाठी ही कामं नक्की करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या वर्षातील पहिला शनिवार. हिंदू कॅलेंडरनुसार आजपासून माघ महिना सुरू झाला आहे. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. ग्रहांमध्ये शनिदेवाला न्यायाची देवता म्हटलं जातं. एखाद्यावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्याला चांगला वेळ येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण अशुभ दृष्टी असेल तर अब्जाधीशही कंगाल होतो. म्हणून अनेक जण शनिवारी शनिदेवाची पूजाअर्चा करतो आणि उपवास करतो. त्यामुळे त्या व्यक्तीवरील सर्व दु:ख नाहीसे होता असा विश्वास असतो. शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की, व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव त्याला त्याचं फळ देतो. जर शनिदेव नाराज झाले तर त्याचा प्रकोप तुमचं आयुष्य उद्धवस्त करतो. त्यामुळे तुमच्यासोबत असं घडू नये म्हणून आणि शनिदेवाची कृपा वर्षभर राहावी म्हणून आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. शिवाय ज्या राशींवर शनीची साडेसाती चालू आहे, त्यांनाही या उपायांमुळे खूप फायदा होईल. (Shanivaar Upay Make sure to do these remedies to please Lord Shani and shani dev ko prasan kaise kare first saturday of year 2023)


'हे' सोपे उपाय शनिवारी करा


मडक्यात तीळ टाकून पिंपळाच्या झाडावर पाणी टाका आणि नतमस्तक झाल्यावर 7 वेळा प्रदक्षिणा करा.


शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.


शनिवारी संध्याकाळी काळ्या उडदाचे दान करा.


हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा.


काळी उडीद पाण्यात वाहावी.


शनिवारी काळी गाय किंवा काळ्या कुत्र्याला भाकरी अर्पण करा. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात.


शनिवारी 'या' गोष्टी करू नका


शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करा. मात्र घरासाठी मोहरीचे तेल कधीही खरेदी करू नका.


या दिवशी काळे तीळ दान करणे शुभ मानलं जातं. मात्र शनिवारी काळे तीळ खरेदी करू नका.


लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचं दान केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो. पण लोखंडी वस्तू खरेदी करू नका.


या दिवशी पूर्व आणि उत्तर दिशेला प्रवास करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे. यामुळे जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.



(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)