Shash Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. सध्या दिवाळी जवळ आली असून यंदाच्या दिवाळीमध्येही खास योग निर्माण होताना दिसतायत. 12 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीत शनीची स्थिती शश महापुरुष राजयोग तयार करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे. याशिवाय 16 आणि 17 नोव्हेंबरला अनुक्रमे रुचक योग आणि युक्त योग देखील निर्माण होणार आहेत. शश महापुरुष योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ मिळणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींचं नशीब या काळात चमकणार आहे. 


मेष रास


शश महापुरुष योग तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. तुमची संपत्ती आणि उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार आहे. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला त्यावर चांगला परतावा मिळू शकणार आहे. चांगल्या शेअर मार्केट एक्सपर्टचा सल्ला घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवू शकता. .


मिथुन रास


शश महापुरुष योग तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमचा व्यवसाय वेगाने प्रगती करेल. नोकरदार लोकांना या काळात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची ओळख आणि प्रशंसा होणार आहे.


मकर रास


अनपेक्षित पैसे मिळण्यासाठी हा कालावधी अनुकूल राहणार आहे. तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी होईल. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदाही होऊ शकतो. विवाहित लोक त्यांच्या जोडीदाराशी नाते दृढ करण्यात यशस्वी होतील. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)