Shash Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्योतिष शास्त्रात न्यायाची देवता शनि ग्रहाला खूप महत्त्व दिलं जातं. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी 30 वर्षे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या काळात शनी कुंभ राशीत मूळ त्रिकोण राशीत आहे आणि 2025 पर्यंत राहणार आहे. यावेळी शनीमुळे शश राजयोग तयार झाला आहे. हा शश राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत, हे पाहूयात.


वृश्चिक रास


शनि मूळ त्रिकोण राशीत असणे आणि शश राजयोगाची निर्मिती भाग्यवान ठरू शकते. यावेळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी काळ अनुकूल राहील. पदोन्नतीसह तुम्हाला वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे. 


कुंभ रास


30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनिची उपस्थिती आणि शश राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी भाग्यवान ठरू शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता. वर्षभर भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळेल. एकाग्रता, ज्ञान, बुद्धी आणि विवेक जागृत होईल.


मकर रास


शश राजयोग लोकांसाठी लाभदायक असणार आहे. यावेळी कामात यश मिळेल. गुरूच्या नक्षत्रात असल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी, ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात तुम्ही जे काही निर्णय घ्याल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकता.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )