Shash And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ योग आणि राजयोग तयार होतात. याचा मानवी जीवनावर आणि देशावर परिणाम होताना दिसतो. सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 19 मे रोजी शुक्र देव स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे दोन्ही राजयोग 30 वर्षांनंतर तयार होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. हे दोन्ही राजयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे, ते पाहुया.


वृषभ रास (Taurus Zodiac)


मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. अभ्यासासाठी परदेशात जायचे होते त्यांनाही ही संधी मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. करिअरच्या आघाडीवरही तुम्हाला चांगले यश मिळेल आणि तुमची व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल.


मकर रास (Makar Zodiac)


मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणूक आणि मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. ज्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होतील. या कालावधीत तुमची गुंतवणूक नफा देईल.


तूळ रास (Tula Zodiac)


मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नोकरदार लोकांना आर्थिक फायदा होईल आणि पदोन्नतीही मिळू शकेल. मालमत्ता आणि वाहने खरेदी करू शकता. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. फॅशन डिझायनिंगशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्यापैकी अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )