Dussehra 2022 Shopping Muhurat: कोरोना महामारीनंतर आज दोन वर्षांनंतर सर्व सण-उत्साह जल्लोषात साजरे होत आहेत. आज सर्वत्र दसऱ्याचा उत्साह आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला दसरा यंदाही मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर 6 अत्यंत शुभ योग तयार झाल्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांग आणि ज्योतिष शास्त्रानुसार आज दसऱ्याला श्रवण नक्षत्राच्या संयोगामुळे छत्र योग तयार होत आहे. याशिवाय सुकर्म योग, धृती योग, रवि योग, हंस योग आणि शशा योग यांसारखे अतिशय शुभ योगही तयार होत आहेत. याशिवाय ग्रहांची स्थिती देखील आज खूप खास आहे. हे योग पूजा, खरेदी, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करण्यासाठी विशेष आहेत.


दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभ योग
दसऱ्याच्या दिवशी सकाळी 06.30 ते 09.15 पर्यंत रवि योग, 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 08.21 पर्यंत सुकर्म योग आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी 08.21 ते 6 ऑक्टोबर रोजी सकाळी  05.18 पर्यंत धृती योग असेल. याशिवाय या दिवशी श्रावण नक्षत्र देखील राहील. 


या कामांसाठी यंदाच्या दसरा शुभ
सोने-चांदी, तांबे-पितळ अशा शुद्ध धातूंच्या खरेदीसाठी दसरा शुभ आहे. याशिवाय कार खरेदी करणे, घर बुक करणं, गृहप्रवेश करणं, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही दसरा अतिशय शुभ आहे. 


दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रे आणि वाहनांचीही पूजा करावी. तसेच बजरंगबलीची पूजा करून त्याला गूळ आणि चणे अर्पण करावा.


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)