Pran Pratishtha : सोमवार म्हणजे महादेव शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठापणा हा दिवस अतिशय खास आहे. सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योगासह अनेक शुभ योग आहेत. श्रीराम, भगवान शंकर आणि चंद्र देवाची कृपा आज 5 राशींवर बरसणार आहे. (Shri Ram Pran Pratishtha day will be auspicious for these zodiac signs Yoga of Wealth with Prosperity due to Ravi rajyog)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी राम प्राणप्रतिष्ठादिन शुभ आणि फलदायी आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा चांगली व्यक्ती म्हणून नावाजणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यवसायात व्यावहारिकतेचा लाभ मिळणार आहे. महादेवाच्या कृपेने तुम्ही अत्यंत अवघड कामेही सहज पूर्ण करणार आहात. 


कन्या रास (Virgo Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी राम प्राणप्रतिष्ठादिन चांगला सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना नशीब साथ मिळणार आहे. घरात सुख समृद्धी नांदणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची शुभ संधी तुम्हाला लाभणार आहे. तुमच्यामधील प्रशासकीय गुणाचं दर्शन होणार आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचं सिद्ध होणार आहे. तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही कठीण निर्णय घेण्यातही यशस्वी होणार आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ येणार आहात. 


तूळ रास (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी राम प्राणप्रतिष्ठादिन लाभदायक असणार आहे. या लोकांना बुद्धिमत्ता आणि विवेकाने काम केल्यामुळे यश प्राप्त होणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या एकाग्रता क्षमतेत चांगली वाढ होणार आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती साधण्यात यश मिळणार आहे. 


धनु रास (Sagittarius Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी राम प्राणप्रतिष्ठादिन लाभदायक असणार आहे. तुमचा धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरीतील लोकांना त्यांच्या अधिका-यांचं सहकार्य लाभणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


राम प्राणप्रतिष्ठादिन या राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना परदेशातून नोकरीची संधी मिळणार आहे. एखाद्याकडून बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चमकदार कामगिरी करण्याच्या अनेक संधी लाभणार आहेत. प्रभावशाली लोकांच्या संपर्कातही तुम्ही येणार आहात. शुभ योगामुळे व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे. कुटुंबात सुख-शांती असणार आहे. प्रेम जीवनात असणारे भविष्यासाठी योजना आखणार असून त्यांचं नातं मजबूत होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)