Shubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत
Shubh Ashubh : हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं.
Shakun Shastra For Lizard : पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी असते. महिलांपासून पुरुषांपर्यंत असंख्य लोकांना पालीची भीती वाटते. पण हिंदू धर्मात प्राण्यांच्या प्रत्येक रुपाला महत्त्व आहे. पाल ही देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पालसंदर्भात काही शुभ अशुभ संकेत आपल्याला मिळत असतात. आता पाल ही जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडली तर हे लक्षणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल आज आपण शकुन शास्त्रानुसार जाणून घेणार आहात. (shubh ashubh about chipkali or lizard Shakun Shastra Astro Tips astrology news in marathi)
काय सांगतं शकुन शास्त्रानुसार?
शकुन शास्त्रानुसार पाल जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडणे हे अशुभ असतं. या संकेतचा अर्थ असा होतो की, भविष्यात तुमच्यावर किंवा घरावर संकट कोसळणार आहे. त्यामुळे जर असं झाल्यास सावध राहा.
जर पाल घरात जमिनीवर फिरताना दिसली तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे.
जर पाल भिंतीवर चढताना दिसली तर हे शुभ संकेत असून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.
जर पाल भिंतीवरुन खालच्या बाजूला उतरताना दिसली म्हणजे हे अशुभ असतं. त्यामुळे अशावेळी तुम्ही भविष्यात काळजी घ्या.
जर तुमच्या घरातील देवघरात पाल दिसली याचा अर्थ तुमचं बँक बॅलेन्स तगड होणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पाल पडली तर हे अशुभ असून त्या व्यक्तीला गंभीर आजार होणार असं शास्त्रात सांगत आलं आहे. शिवाय त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला पाल पडली म्हणजे हे शुभ संकेत आहेत. तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.
पण पाल जर तुमच्या छातीच्या डाव्या बाजूला पडली तर हे अशुभ असून घरात वादविवाद होण्याची दाट शक्यता असते.
नवीन घरात किंवा दुकानात तुम्हाला मेलेली पाल दिसल्यास हे अशुभ असून भविष्यात कुटुंबातील सदस्याची प्रकृती बिघडू शकते.
घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसल्या हे अशुभ असून भविष्यात तुमचं जोडीदाराशी वाद होतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)