Shubh Rajyog 2023 : 700 वर्षांनंतर घडणार `हा` अद्भुत शुभ योगायोग; `या` 4 राशींवर बरसणार पैसा
केदार, हंस, मालव्य, चतुष्चक्र आणि महाभाग्य असा हा योग आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, जेव्हा अनेक राजयोग एकत्र तयार होतात त्यावेळी राशींवर वेगळा प्रभाव पडतो.
Shubh Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या संक्रमणांने अनेक राजयोग तयार होतात. मुख्य म्हणजे ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतोना दिसतो. असात आता 700 वर्षांनंतर पाच राजयोगांचा संयोग होणार आहे. 28 मार्च रोजी हा योगायोग घडून येणार आहे.
केदार, हंस, मालव्य, चतुष्चक्र आणि महाभाग्य असा हा योग आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, जेव्हा अनेक राजयोग एकत्र तयार होतात त्यावेळी राशींवर वेगळा प्रभाव पडतो. मात्र यामध्ये 4 राशी अशा आहेत, ज्यांच्यावर या संयोगाचा परिणाम अधिकतर दिसून येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तींना या राजयोगाचं चांगलं फळ मिळू शकणार आहे. यामध्ये जे बेरोजगार आहेत त्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. याशिवाय काहींना धनप्राप्ती देखील होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसंच आर्थिक स्थितीही सुधारणार आहे.
कर्क (Cancer)
हंस आणि मालव्य राज योग तयार होणं हे कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे. काहींना करिअरमध्ये अपेक्षित परिणाम मिळू शकणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना भरगोस आर्थिक लाभ मिळेल.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी 5 राजयोग तयार होणं एक चांगला संकेत आहे. या राशीच्या व्यक्तींना जीवनसाथीची साथ लाभणार आहे. तुमच्या बिझनेसमध्ये मोठे आणि महत्त्वाचे करार होऊ शकतात. एक गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्ती अविवाहित आहेत ते त्यांच्या नात्याबद्दल समोरच्या व्यक्तीशी बोलू शकतात.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हंस आणि मालव्य राज योगातून चांगले आणि शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची जी काम रखडलेली असतील ती पूर्ण होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)