Shukra Asta 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. शुक्र ग्रह (Shukra Grah) हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. कुंडलीत शुक्र ग्रहाच्या बलामुळे व्यक्तीला या क्षेत्रांत यश मिळते. येत्या 8 ऑगस्ट 2023 रोजी शुक्र वक्री (Shukra Vakri 2023) होऊन कर्क राशीत अस्त (Vakri Shukra Asta 2023) होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी शुक्र वक्री चाल चालतो आणि अस्त होते तेव्हा अनेक राशीच्या राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडतो. ज्या राशींच्या कुंडलीमध्ये शुक्र कमजोर स्थितीत असतो त्यांना वैवाहिक जीवन, प्रेम जीवन आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया की शुक्र वक्री आणि अस्तामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.


मिथुन रास (Mithun Rashi)


शुक्राच्या या स्थितीमुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्याकडून वायफळ खर्च होणार असून कुटुंबातील सदस्याच्या आजारावर खर्च होऊ शकतात. आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. लॉटरी किंवा सट्टा यांच्यामध्ये पैसे खर्च करू नका. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ थोडा कमजोर असू शकतो. 


धनु रास (Dhanu Rashi)


वक्री शुक्र धनु राशीच्या आठव्या घरात अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. गाडी चालवताना तसंच प्रवास करताना काळजी घ्यावी. अचानक आलेल्या त्रासामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. 


तुळ रास (Tula Rashi)


कर्क राशीत शुक्राच्या अस्तामुळे तूळ राशीच्या लोकांचा अडचणींचा काळ सुरु होणार आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं. कर्क राशीत शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणतंही काम करताना काळजी घ्या, तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. तसंच या काळात नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )