मुंबई : नऊ ग्रह वारंवार राशिचक्र बदलत असतात. यामुळे त्यांची स्थिती आणि हालचाल वेळोवेळी बदलत राहते. शुक्राचा सिंह राशीत 31 ऑगस्टला प्रवेश झाला आहे. तर ग्रहांचा राजा सूर्य आधीच या राशीत बसला आहे. हे दोन प्रमुख ग्रह एकाच राशीत आल्याने अनेक राशींना फायदा होतो, पण 4 राशी असलेल्यांना खूप काळजी घ्यावी लागते. दोन्ही ग्रहांच्या संयोगाचा 5 राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल. चला जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक स्थितीवर होणार परिणाम


कन्या


या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिकट असू शकते. त्यांना खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर द्यावा लागतो. पैशाच्या कमतरतेमुळे घरातील अनेक महत्त्वाची कामं थांबू शकतात, त्यामुळे ग्रह-संकटाची परिस्थिती निर्माण होईल. 


नोकरी आणि व्यवसायात कठीण काळ


मीन


सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना अनेक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यांची सामाजिक स्थिती कमी होऊ शकते. मुलाच्या बाजूने त्यांना निराशेचा सामना करावा लागू शकतो. पूर्वीचे आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाचा खर्च वाढेल. 


करियरमध्ये येऊ शकतो वाईट टप्पा


मकर


सिंह राशीत शुक्र आणि सूर्य एकत्र असल्यामुळे 'या' राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला करिअरशी संबंधित काही वाईट बातमी मिळू शकते. तुमचं प्रमोशन थांबू शकतं आणि नोकरीत अनेक प्रोजेक्ट हाताशी जाऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप संयमाने काम करावे लागेल.


आजारपण लागेल मागे


कर्क


या राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील सदस्याला अचानक एखादा नवीन आजार घेरू शकतो. औषधं आणि उपचारांवर खूप खर्च येऊन अडचणींचा सामना करावा लागेल. तुमची अनेक कामं अचानक बिघडू शकतात. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.