Shukra Gochar 2022 in Marathi : डिसेंबर महिन्यात शुक्र गोचरचा अनोखा योग आहे. या 4 राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर 2022, अतिशय चांगला असणार आहे. आज,  शुक्र 11 नोव्हेंबर, 2022 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये शुक्र ग्रह दोनदा राशी बदलेल. महिन्यातून दोनदा शुक्र बदलल्याने चार राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. शुक्र 3 डिसेंबर 2022 रोजी धनु राशीत आणि नंतर 29 डिसेंबर 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करेल. शुक्राचे 2 वेळा अशा प्रकारे गोचर केल्याने काही राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक समृद्धी मिळेल. डिसेंबर महिन्यात शुक्राचे संक्रमण कोणत्या राशीसाठी भाग्यवान ठरेल ते पाहा.


या राशींचे भाग्य शुक्र गोचरने चमकणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. बचत करण्यात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करु शकता. या काळात आरोग्याची काळजी घ्या.  शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. 


मिथुन: शुक्राचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. उत्पन्न वाढेल. व्यवसायात लाभ होईल. तथापि, खर्च वाढल्यामुळे आपण बचत करू शकणार नाही. जीवनात सुख-सुविधा वाढतील. 


कर्क : शुक्राच्या राशीत बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.  करिअरची कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते. मात्र, सर्वांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा. जीवनात चैनीच्या गोष्टी वाढतील. 


कन्या : करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. आईच्या मदतीने मोठा प्रश्न सुटेल. उत्पन्न वाढेल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. शुक्राचे दोन्ही राशी बदल कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होतील. त्यांच्या जीवनात आनंद येईल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)