शुक्र गोचर 2022 : शुक्र 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 08:51 वाजता कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे, तर मीन त्याची उच्च राशी तर कन्या त्याची निम्न राशी मानली जाते. या संक्रमणाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल आणि काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभावही पडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, जीवनसाथी, चांगले विचार आणि सर्व भौतिक सुखांचा घटक मानला जातो. शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या शुभ प्रभावाने व्यक्तीच्या जीवनात चांगले गुण निर्माण होतात.


1. वृषभ


शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. कन्या राशीत शुक्र गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. कुटुंबाशी संबंध आणखी चांगले होतील तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. आर्थिक स्थितीत सुधारेल. करिअरमध्ये तुम्ही उंची गाठाल. मान-प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवनात चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा होईल. व्यवहारात अडकलेले पैसे परत मिळू शकतात.


2. मिथुन


मिथुन राशीचा स्वामी बुध आणि शुक्र हा बुधचा मित्र ग्रह मानला जातो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. या काळात मालमत्तेच्या बाबतीतही लोकांना फायदा होईल. घर खरेदी करणे चांगले होईल. आर्थिक जीवनात धनलाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. दीर्घकालीन आजारापासून आराम मिळेल. कायदेशीर बाबींमध्येही विजय मिळण्याची शक्यता आहे.


3. कन्या


कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा त्यांच्या दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि आता शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीच्या लोकांना शुक्राच्या प्रभावामुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवनात सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभही होईल. आयुष्यातील जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. जीवनात आनंद येईल. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे.