Shukra Gochar 2023 February effect on Zodiac Signs in marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्वं आहे. यामुळे आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतं असतो. काही राशींसाठी ग्रहांचं संक्रमण चांगल असते तर काही राशींच्या लोकांसाठी तो वाईट काळ घेऊन येतो. आज शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रामध्ये धन विलास, प्रेम सौंदर्य यांचा कारक म्हणून शुक्र ग्रहाला ओळखलं जातं. पण मीन राशीत पहिलेच बृहिस्पति (Venus Transit in Pisces 2023) आहे. त्यामुळे हा शुक्र आणि गुरुचा संयोग असणार आहे. या संयोगाचा 12 ही राशींवर शुभ आणि अशुभ (Shukra Gochar 2023 Bad Effect) परिणाम दिसून येणार आहे. (Shukra Gochar 2023 February 15 Effect On All Zodiac Signs and Venus Transit in Pisces 2023 horoscope 2023 in marathi)



मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्र ग्रहाचं संक्रमण हे या राशीच्या लोकांसाठी खर्चिक असणार आहे. तुम्ही बजेट बनवा आणि आवश्यक असेल तेवढाच खर्च करा अन्यथा तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता. आरोग्याचीही काळजी घ्या. अन्नपदार्थ खाताना काळजी घ्या कारण खराब अन्न तुमची समस्या वाढवू शकतो. प्रियकर किंवा जोडीदाराकडून दुरावण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी निवांतपणे बोला वेळ घालवा. 



मिथुन (Gemini)


शुक्राचं संक्रमण हे या राशीच्या लोकांसाठी करिअरदृष्टीने घातक आहे. त्यांचा करिअरमध्ये अचडणी येणार आहेत. या लोकांनी दिखाऊपणा टाळाला हवा आणि सहकाऱ्यांशी जुळवून घ्यायला हवं. याशिवाय या राशींच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी कमी बोललेलच चांगल राहिल. नाही तर कोणी तरी तुमच्या विरोधात कट करु शकतं. 



तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या राशी बदलामुळे खर्चात वाढ होईल. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुम्हाला अपेक्षित परिणाम न मिळाल्यास, धीर धरा. आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ (Aquarius)


शुक्राचं संक्रमण तसं तर कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभदायक असतं. पण यावेळी शुक्र आणि गुरूचा संयोग कुंभ राशींच्या लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. त्यांना करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मन अस्वस्थ होईल. अधिकाऱ्यांशी ताळमेळ ठेवा. तसंच खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. ही वेळ संयमाने घेणे योग्य ठरेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)