Shukra Gochar 2023 Lucky Zodiac Sign : शुक्र हा आनंद, विलास, ऐश्वर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, असे लोक आयुष्यभर विलासी जीवन जगतात. अवघ्या काही दिवसांनी शुक्राचं गोचर होणार आहे. वैदिक शास्त्रामध्ये शुक्राचं गोचर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र बलवान मानला जात असेल तर त्या व्यक्तीचं लग्न लवकर होतं, असं मानलं जातं. शुक्राच्या गोचरचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. सध्या शुक्र कर्क राशीत असून 7 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


तुळ रास


तूळ राशीसाठी शुक्राचे गोचर अत्यंत उत्तम मानलं जातं. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. बिझनेसमधून भरपूर पैसै मिळणार आहेत.  व्यवसायात सामाजिक संपर्काचा लाभ होईल. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होतील.


मेष रास


मेष राशीसाठी शुक्राचे गोचर प्रेमसंबंध घट्ट करणारं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. थांबलेले पैसेही मिळतील. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने आकर्षित होतील. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप गंभीर असाल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात रोमान्सचा प्रवेश होणार आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. 


वृषभ रास


वृषभ राशीसाठी शुक्राचं गोचर शुभ राहणार आहे. घरामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जाऊ शकतं. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. व्यापाऱ्यांना नफा कमावता येईल.  थोडे अधिक मेहनत केल्यानंतर व्यवसायात फायदा होईल.


कुंभ रास


शुक्राच्या संक्रमणाने कुंभ राशीचे भाग्य उजळू शकतं. तुम्ही तुमच्या वाणीच्या जोरावर लोकांची मने जिंकाल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुमच्या उत्पन्नाचे साधनही वाढेल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वतःवर आणि छंदांवर खर्च करू शकता.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )