Shukra Gochar 2023 : आज शुक्रदेव - मंगळदेव युती, शुक्र गोचरमुळे 5 राशींवर पैशांचा पाऊस?
Shukra Gochar : मे महिन्यातील पहिला ग्रह आज आपली जागा बदलणार आहे. शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासून मंगळ ग्रह असल्याने इथे शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार असल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज सांगत आहेत. (astro news in marathi)
Mangal Shukra Yuti 2023 : ग्रह गोचरसाठी मे महिन्यात खूप खास असणार आहे. या महिन्याभरात चार ग्रहाचं परिवर्तन होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे ठराविक वेळेनंतर आपला राशीत बदल करतात. ग्रहांचा उदय आणि अस्त हा मानवी जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम करतात. आज शुक्र गोचर आहे, म्हणजे शुक्र ग्रह हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. (Shukra Gochar 2023 Mangal Shukra Yuti Venus 5 zodiac signs will be rich Transit in Gemini in marathi )
शुक्र आणि मंगळाचा युती
आजचा शुक्र गोचर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासूनच मंगळ ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मेष राशीत शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे. शुक्र - मंगळ युतीमुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार. मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत पुढील आठ दिवस राहणार आहे.
किती वाजता होणार शुक्र गोचर?
शुक्र ग्रह हा धन, संपत्ती आणि प्रेमाचा कारक मानला जातो. तर मंगळ हा आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिक आहे. दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र आणि मंगळाची युती होऊन येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.
मेष (Aries)
या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. पैसे कमावण्याच्या अनेक संधी चालून येणार आहे. व्यवयासायासाठी हा शुभ काळ ठरणार आहे.
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांना प्रंचडप्रमाणात धनलाभ होणार आहे. करिअरसाठी हा काळ शुभ असणार आहे. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी मालमत्तेसंदर्भात चांगला ठरणार आहे. या काळात तुमचे जास्तीचे पैसे खर्च होणार आहेत.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी हा काळ खर्चिक ठरणार आहे. आरामदायी वस्तूंवर खर्च होणार आहे. कोर्टकचेरीचं प्रकरणामुळे मानसिक त्रास होणार आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात प्रत्येक कामात यश मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?
कन्या (Virgo)
या राशीला महिनाभर नशिबाची साथ मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. पदोन्नती आणि पगार वाढीचे योग आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. कामाचा मोबदला मिळण्याचा हा काळ ठरणार आहे.
वृश्चिक (Scorpio)
या राशींसाठी हा महिना खर्चिक ठरणार आहे. शुक्र गोचरच्या काळात आर्थिक लाभ तर होणार आहे पण तो पैसा येणार आणि दुसऱ्या हाताने जाणार आहे. शेअर मार्केटमधून धनलाभ होणार आहे.
धनु (Sagittarius)
तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला धनलाभ आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. आरोग्यामध्ये सुधारणा घेणार आहे.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी हा महिना खर्चिक आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या उत्पन्नात घट दिसून येणार आहे.
कुंभ (Aquarius)
या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे. तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ आणि मालमत्तेचे फायदे होणार आहेत.
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांना नवीन वाहन खरेदीचा योग आहे. भावंडांकडून आर्थिक लाभ होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.