Shukra Gochar 2023 : होळीनंतर राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे `या` राशी होणार मालामाल
Shukra Rashi Parivartan : होळीनंतर राहु आणि शुक्र यांचा संयोग होणार आहे. जेव्हा शुक्र हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. या राशींमध्ये तुमचा राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात.
Shukra RahuYuti in marathi : हिंदू धर्मात राशी आणि ग्रहांना खूप महत्त्व आहे. कुंडलीतील ग्रह तुमचं भाग्य ठरवतात. शुक्र हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा शुक्र गोचर होईल तेव्हा अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. 12 मार्चला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीमध्ये आधीच राहूचा वास आहे. त्यामुळे शुक्र आणि राहुचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे अनेक राशींना अचानक धनलाभ होणार आहे. (Astrology Today In marathi) (shukra gochar 2023 these Pisces Sagittarius Leo Gemini Aries zodiac signs get money Astrology Today In marathi)
मेष (Aries)
शुक्र हा मेष राशीत प्रवेश करणार असल्याने सगळ्यात जास्त फायदा हा मेष राशीच्या लोकांना होतो. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व उजळून निघणार आहे. शुक्र गोचरमुळे तुमचं लव्ह लाइफ चांगल होणार आहे. विवाहितांना जोडीदाराचं प्रत्येक कामात आणि निर्णयात साथ मिळणार आहे. त्यांचं नात या काळात घट्ट आणि मजबूत होणार आहे.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर हे भाग्यशाली ठरणार आहे. तुमची नवीन लोकांशी ओळख होईल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी कळणार आहे. शुक्र गोचर हे मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरणार आहे.
सिंह (Leo)
शुक्र गोचर हा सिंह राशीच्या लोकांसाठी नशीब चमकणार आहे. विवाहित जोडप्यासाठी हा काळ खूप भाग्यशाली असणार आहे. कुठल्याही कामात हात टाकल्यावर तुमचा फायदा होणार आहे. उत्पन्नाची नवीन नवीन संधी मिळणार आहे. परदेशी जाण्याचे योग चालून येणार आहे.
धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. खास करुन विद्यार्थ्यांना नशिबाची साथ मिळणार आहे. याशिवाय विवाहित जोडप्यांसाठी हा आनंदाचा काळ असणार आहे. कुठलं जुन प्रकरण असेल तर ते मार्गी लागणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्हाला अचानक वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होणार आहे. नोकरदारासाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे.
मीन (Pisces)
मीन राशीसाठी शुक्र गोचर हे उत्तम काळ ठरणार आहे. या काळामध्ये तुम्ही भरपूर पैशा बचत करणार आहात. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. सासरीची मंडळी तुमच्यावर खूष होणार आहेत. लोक तुमच्या प्रभावाखाली वावरणार आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)