Shukra Gochar 2023: शुक्र करणार मेष राशीत गोचर; `या` 3 राशींना मिळणार लाभ
मेष राशीतील शुक्र हा रोमँटिक असण्यासोबत धाडसी आणि धोका पत्करणारा असू शकतो. याचा कोणत्या राशींना लाभ होणार ते पाहूया.
Shukra Gochar 2023: शुक्र हा सुख आणि समृद्धीचा कारक मानला जातो. यासोबतच सर्व राशींच्या समृद्धीसाठी देखील शुक्र ओळखला जातो. असंच 12 मार्च म्हणजेच रविवारी शुक्र 08.13 मिनिटांनी मेष राशीत परिवर्तन करणार आहे.
असं मानलं जातं की, कुंडलीमध्ये जर शुक्राची स्थिती चांगली असेल तर जीवनात प्रेम आणि सुख मिळतं. राहू हा आधीच मेष राशीमध्ये आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, शुक्र आणि राहू यांच्यात गुरु आणि शिष्याचा संबंध मानला जातो. मेष राशीतील शुक्र हा रोमँटिक असण्यासोबत धाडसी आणि धोका पत्करणारा असू शकतो. याचा कोणत्या राशींना लाभ होणार ते पाहूया.
मेष
शुक्राचं हे गोचर मेष राशीच्या घरात होणार आहे. त्यामुळे हे गोचर मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम देणार आहे. या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणेल. यावेळी कौटुंबिक सहकार्य मिळू शकणार आहे. शिवाय प्रेमसंबंध मजबूत होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हा काळ आर्थिक लाभाचा असणार आहे.
मिथुन
शुक्राचे हे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींच्या नवव्या घरात होणार आहे. यासोबतच राहुदेवही त्याठिकाणी उपस्थित असणार आहेत. शुक्र आणि राहूचा संयोग हा या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देणार आहे. मात्र या काळामध्ये संयम ठेवावा लागणार आहे. सिंह राशीच्या लोकांनी यावेळी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये असा सल्ला आहे.
धनु
शुक्राचं हे गोचर धनु राशीच्या पाचव्या घरात होणार असून या राशीच्या लोकांना शुक्राच्या या संक्रमणामुळे चांगले परिणाम मिळणार आहेत. विवाहित जोडप्यांसाठी हे गोचर शुभ ठरणार आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातूनही हे चांगलं गोचर ठरणार आहे. मात्र यामध्ये संकटांनी भरलेला काळही लवकरच संपणार आहे.