Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात शुक्र हा कला, सौंदर्य, विवाह, वाहन, प्रेम यांचा कारक मानला जातो. अशावेळी शुक्राच्या प्रत्येक परिवर्तनाता सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. शुक्र ग्रह आता वक्री गतीमध्ये आहे. येत्या 7 ऑगस्ट 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत या राशीत राहील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शुक्र वक्री स्थितीत फिरतोय. अशा स्थितीत शुक्राचे गोचर हे सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींसाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. मात्र काही राशींसाठी हा काळ फार कठीण असू शकतो. जाणून घेऊया शुक्र गोचरच्या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 


कन्या रास


या काळात या राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगून काम करावं लागणार आहे. अन्यथा चुकीचे परिणाम भोगावे लागू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. यावेळी खर्च वाढू शकतो आणि बचत कमी होईल. मुलांसाठी तुम्ही थोडे चिंतेत दिसू शकता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक क्षेत्रातही विशेष काळजी घ्या. मोठी आर्थिक जोखीम घेणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. 


कर्क रास


शुक्र गोचरच्या काळात या राशींच्या व्यक्तींना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात स्थानिकांना आर्थिक क्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबतच्या नात्याला तडा जाऊ शकतो. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेणे टाळा. 


सिंह रास


या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चढ-उतार असणार आहेत. या काळात धनहानीला सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात अजिबात गुंतवणूक करू नका. जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. खर्च वाढल्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. अनैतिक संबंधांमध्ये गुंतणे टाळा. आर्थिक नुकसानासह कौटुंबिक कलह होऊ शकतो. 


कुंभ रास


या काळात या राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. खर्च वाढतील. शुक्र गोचरचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवरही होऊ शकतो. या काळात आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची चुकीची वागणूक महागात पडू शकते. अचानक आर्थिक संकटं उभं राहू शकतं.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )