Shukra Gochar On Ganesh Chaturthi 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या गोचराला महत्त्व आहे. त्यामुळे ग्रह गोचर आणि सण याकडे ज्योतिष्यांचं विशेष लक्ष असतं. कारण शुभ दिवस आणि त्या दिवशी होणारे गोचर फलदायी ठरतात. 31 ऑगस्ट 2022 रोजी देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणपतीचं घरी आगमन होईल. या दिवशी मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. असं असताना गणेश चतुर्थीला शुक्र गोचर होणार आहे. शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, आनंद आणि संपत्तीचा कारक ग्रह मानलं जातं. या गोचरामुळे कर्क राशीसह तीन राशींना शुभ फळं मिळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्क: शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ प्रभाव पडेल. या राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना आर्थिक लाभासोबतच त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मुलाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते.


तूळ: ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हे गोचर खूप फायदेशीर असणार आहे. या राशीत शुक्र अकराव्या स्थानात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरीव यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी क्षण अनुभवता येतील. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल.


वृश्चिक: या राशीच्या दहाव्या स्थानात शुक्राचे भ्रमण होणार आहे. यामुळे या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश मिळेल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. याच आधारावर तुम्हाला बढती दिली जाईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)