Shukra Gochar 2023: 3 दिवसांनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; `या` राशींनी रहावं सावधान, अडचणींचा काळ होणार सुरु
Shukra Gochar 2023 : येत्या काही दिवसांमध्ये शुक्र गोचर करणार आहे. यावेळी शुक्र ग्रह 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Shukra Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. येत्या काही दिवसांमध्ये शुक्र गोचर करणार आहे. शुक्र ग्रह हा धन, विलास आणि सुखाचा कारक मानला जातो. यावेळी शुक्र ग्रह वक्री गतीमध्ये आहे. दरम्यान शुक्राच्या प्रतिगामी गतीचा प्रत्येकाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडताना दिसको.
दरम्यान येत्या 7 ऑगस्ट 2023 वक्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शुक्र ग्रह 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी शुक्राच्या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होताना दिसणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
कर्क रास
वक्री शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या व्यक्तींसाठी अडचणींचा काळ येणार आहे. यावेळी धनहानी होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही कारणावरून घरामध्ये वाद होऊ शकतात. इतरांवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका.
सिंह रास
वक्री शुक्राचं गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार नाही. या लोकांचा पैसा कुठेतरी अडकू शकतो. यावेळी गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबातील कोणत्याही आजारावर पैसे खर्च होऊ शकतात. कोणाशीही वाद होऊ शकतो. या काळात तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं.
कन्या रास
वक्री शुक्र कन्या राशीच्या लोकांना काही अडचणीत टाकू शकतो. वादविवाद आणि राग टाळा, अन्यथा तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. करिअरमध्ये आव्हानांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ थोडा कमजोर असू शकतो. कोणाच्याही सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका. आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )