मुंबई : Shukra Rashi Parivartan May 2022: शुक्रदेव हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जेव्हाही ते आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. या राशी बदलामुळे अनेकांचे नशीब बदलते. त्यानंतर अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. यावेळी 23 मे रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत जाणार आहे. या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम होईल हे जाणून घ्या...


आर्थिक स्थिती सुधारेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनु : व्यवहारासाठीही काळ चांगला आहे. देवी लक्ष्मीची कृपा राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी चांगला वेळ आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नवीन वाहन खरेदी करू शकता.


मेष : देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवन आनंदमय होईल. आर्थिकदृष्ट्या आणखी मजबूत व्हाल. गुंतवणुकीतून फायदा होईल. खर्च कमी होतील. व्यवहारासाठी हा महिना अतिशय शुभ राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.


व्यवसायासाठी चांगला काळ


वृश्चिक : व्यवहारासाठी काळ शुभ राहील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता.


कुंभ : व्यापारी वर्गासाठी हा काळ आशिर्वादापेक्षा कमी नाही. गुंतवणुकीसाठी वेळ पुरेसा आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी वेळ शुभ आहे. यावेळी आर्थिक लाभ होईल, परंतु खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.


नवीन वाहन - घर खरेदीचा योग


मिथुन : व्यवहारासाठी काळ शुभ आहे, पण व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा. देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ. नवीन घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे.