Shukra Margi 2023 : प्रेम, ऐश्वर्य, आनंद आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह लवकरच गोचर (Shukra Gochar 2023) होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतो. शुक्र ग्रह चंदाच्या स्वामी रास आणि शुक्राच्या शत्रू रास म्हणजे कर्क राशीत 04 सप्टेंबर मार्गी होणार आहे. 04 सप्टेंबर सकाळी 6.17 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा अतिशय शुभ मानला जातो.  शुक्र गोचर काही राशींना लखपती करणार आहे. (Shukra Margi 2023 venus is going to move in cancer these zodiac signs bank balance to raise money)


कुंडलीतील शुक्राचा प्रभाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा स्त्री ग्रह असून सौंदर्याचा ग्रह आहे. कुंडलीतील शुक्र ग्रहाच्या स्थितीवर लग्न किंवा प्रेमसंबंध अवलंबून असतो. एखाद्या कुंडलीतील शुक्र बलवान असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन किंवा लव्ह लाइफ यशस्वी होतं. पण जर शुक्र कमजोर असेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 


मेष (Aries)


या राशीच्या लोकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. तर तुमच्या चौथ्या भावात क्षणभंगुर असेल. त्यामुळे कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाणार आहे. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. चैनीच्या गोष्टींवर पैसा खर्च होणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत चांगली बातमी मिळणार आहे. मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. तो तुमच्या दुसऱ्या घरात फिरणार आहे. त्यामुळे आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात यश घेऊन येणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. 


कन्या (Virgo)


या राशीसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. तसंच तुमच्या अकराव्या घरात शुक्राचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे संपत्ती, ऐश्वर्य किंवा ऐषारामाशी संबंधित इच्छा तुमच्या या काळात पूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती या काळात सुधारणार आहे. तुम्हाला या काळात नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - September Grah Gochar 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रहांचं गोचर! 'या' राशींना धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)