Shukra Rashi Parivartan August 2022: प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. या राशी बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम होत असतो. 7 ऑगस्टला धन आणि प्रसिद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण तीन राशींसाठी हा बदल सकारात्मक असेल. गोचर कुंडलीत अकरावं, दहावं आणि दुसरं स्थान महत्त्वाचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंह: या राशीच्या दुसऱ्या स्थानात शुक्र ग्रह प्रवेश करणार आहे. गोचर कुंडलीत दुसरं स्थान  धन आणि वाणीचं स्थान असतं. त्यामुळे शुक्राचा सकारात्मक बदल या राशीवर जाणवेल. या दरम्यान अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच उद्योग धंद्यात करार निश्चित होऊ शकतात. जे लोक मार्केटिंगशी निगडीत आहेत, त्यांना विशेष फायदा होईल. या काळात आपल्याला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.


तूळ: या राशीच्या दहाव्या स्थानात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. हे स्थान उद्योग आणि नोकरीचं स्थान मानलं जातं. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच कार्यशैलीत देखील फरक जाणवेल. या काळात उद्योग व्यवसायात विस्तार होऊ शकतो. तसेच उत्तन्नात वाढ होऊ शकते.


कन्या: या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात शुक्र भ्रमण करणार आहे. हे स्थान उत्पन्नाशी निगडीत आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या लोकांचं करिअर मीडिया, फिल्म, बँकिंग आणि फॅशन डिझाईनिंगशी संबधित आहे. त्यांना विशेष फायदा होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)