Surya and Shukra Yuti in Singh Rashi 2022:  राजकारणाप्रमाणे ज्योतिष ग्रहमंडळातही युती आघाड्या होत असतात. याचे परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर होतात. शुक्र ग्रहाने राशी बदल करत सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह ही सूर्याची स्वामीत्व असलेली रास आहे. या राशीत सूर्यदेव आधीच विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि शुक्राची युती झाली आहे. या युतीचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. पण तीन राशी अशा आहेत की, या युतीचा प्रभाव त्यांच्यावर चांगला प्रभाव असणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- शुक्र संक्रमणामुळे सूर्य आणि शुक्राची युती वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. करिअरमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. पदोन्नती, पगार वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात मौल्यवान खरेदी करू शकता.


सिंह- सूर्य आणि शुक्र सिंह राशीत एकत्र येत आहेत, या राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो. पैसे येण्याचे नवीन मार्ग तयार होतील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच आदर वाढेल.


तूळ- तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांना सूर्य आणि शुक्राचा योग खूप लाभ देईल. त्यांचे उत्पन्न वाढू शकते. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. मोठ्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)