Shukra Uday In Cancer : 18 ऑगस्टला उजळणार `या` राशींचं नशीब; शुक्राच्या उदयाने मिळणार छप्परफाड पैसा!
Venus Uday In Cancer : शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे.
Venus Uday In Cancer : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. किंवा काही ग्रह हे उदय किंवा अस्त होतात. दरम्यान आता ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह उदय होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी शुक्र कर्क राशीमध्ये उदय होणर आहे.
शुक्र ग्रह हा वैभव, ऐश्वर्य, संपत्ती यांचा मानला जातो. ज्यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा उदय लाभदायक ठरू शकणार आहे. या यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. यासोबतच तुमच्या मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होणार आहे. यावेळी तुमच्या सर्व योजना यशस्वी होणार आहेत. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही यावेळी आनंदी राहणार आहे.
मकर रास ( Capricorn Zodiac )
शुक्राचा उदय मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून सातव्या भावात वर येणार आहे. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगला लाभ मिळू शकतो. शुक्राच्या उदयामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. अविवाहित आहेत, त्यांचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे.
मीन रास ( Pisces Zodiac )
धन आणि वैभव देणारा शुक्राचा उदय मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखं मिळू शकणार आहेत. वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबियांचं सहकार्य मिळणार आहे. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत, तुम्हाला कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होईल. यासोबतच इतर माध्यमातून पैसे मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )