या राशीच्या व्यक्तींसाठी चांदी शुभ, आरोग्य ते आर्थिक परिस्थिती होणार अनेक फायदे
या रुपात चांदीचा वापर केला तर नशीबही चमकेल आणि शरीरही निरोगी राहील
मुंबई : धार्मिक दृष्टीकोनातून चांदी हा खूप पवित्र धातू मानला जातो. स्त्रियांमध्ये पैंजण, जोडवी, चांदीची अंगठी घातली जाते. चांदीचं ज्योतिष शास्त्रातही खूप महत्त्व आहे. चांदीमुळे धन आणि पैसा चांगला राहातो असं म्हणतात. तर कुंडलीतला शुक्र आणि मन चांगलं राहातं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चांदी मदत करते.
कफ पित्त आणि वात यासारख्या अनेक समस्यांपासून आराम चांदी देतं. परंतु बऱ्याचदा चांदीमध्ये इतर धातूही मिश्र असतात. त्यामुळे चांदीची शुद्धता पाहून त्यानुसार दागिने घ्यावेत असंही सांगितलं जातं. स्त्रियाच नाही तर प्रत्येकाचा जीवनात चांदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे चांदीचे दागिने काही राशीच्या व्यक्तींनी परिधान करणं खूप शुभ मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात लहान बोटात शुद्ध चांदीची अंगठी घालणे चांगले. चंद्राचा अशुभ प्रभाव दूर होतो असं म्हटलं जातं. यासोबतच मानसिक संतुलन चांगले राहण्यास सुरुवात होते आणि पैसाही प्राप्त होतो.
कफ, पित्त आणि वात हे शुद्ध चांदीचे ब्रेसलेट धारण करून नियंत्रित करू शकतात असंही सांगितलं जातं. त्यामुळे शरीर निरोगी राहून लवकर आजारी पडत नाही. शुद्ध चांदीचे अलंकार घातल्याने आपल्या वाणीवर त्याचा परिणाम होतो असं म्हणतात. हार्मोन्स संतुलित राहतात असंही सांगितलं जातं. याशिवाय मन एकाग्र होतं असंही म्हटलं जातं.
चांदीचा वापर करताना ही काळजी घ्या
चांदीची अंगठी घालताना ही काळजी घ्या की चांदीची शुद्धता पडताळा. भावनिक समस्या होत असतील तर चांदीचे अलंकार घालणं टाळा. वृश्चिक, मीन आणि कर्क राशीच्या लोकांनी चांदीचे अलंकार परिधान करणं शुभ मानलं जातं. सिंह, धनु आणि मेष राशीच्या लोकांना चांदीचे अलंकार घालणं शुभ मानलं जात नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही पुष्टी करत नाही.)