Simian Line On Palm: हस्तरेषा शास्त्रामध्ये काही अशा मुद्द्यांविषयी सांगण्यात आलं आहे, ज्या अतिशय शुभसूचक असतात. या रेषा फार कमी लोकांच्या हातावर पाहायला मिळतात. पण, ज्यांच्या हाती या रेषांचं बळ असतं, ती मंडळी श्रीमंतीपासून फार काळ दूर राहत नाहीत. हातावर असणाऱ्या रेषांमध्ये अतिशय महत्त्वं असते ते म्हणजे 'सीमियन लाइन'चं. (Simian Line On Palm signifies wealth health and success)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे असते 'सीमियन लाइन'? 
'सीमियन लाइन' काहींच्या हातावरून हृदय रेषा आणि मस्तक रेषेला छेदून निघते. ही रेषा असणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या भक्कम आणि काहीसे भावुकही असतात. ही मंडळी फार बुद्धिमान आणि समजुतदारही असतात. अतिशय पटापट निर्णय घेणारी ही मंडळी आत्मविश्वासानं परिपूर्ण असतात. त्यांचं मन नाजूक असतं. 


श्रीमंती तुमच्याच पदरी 
'सीमियन लाइन' ज्यांच्या हाती आहे, ती मंडळी प्रचंड श्रीमंत असतात/ होतात. त्यांच्याकडे कधीच आर्थिक चणचण भासत नाही. अशा व्यक्ती चांगल्या जोडीदाराचं प्रतीक असतात. महिलांच्या हाती अशी रेषा असणं मात्र आव्हानात्मक आयुष्याचं द्योतक ठरतं. त्यामुळं महिलांच्या हाती अशी रेषा असणं फायद्याचं मानलं जात नाही. 


दोन्ही हातांवर 'सीमियन लाइन' असणारी माणसं लाखात एक असतात. अशा व्यक्ती त्यांच्यापुढं आलेली संधी अजिबातही चुकवत नाहीत. यश मिळवण्यासाठी ते योग्य वेळ साधतात. पण, बऱ्याचदा ते नैतिक मूल्य विसरल्यामुळं काही चुकीची कामंही करतात. 


(वरील माहिती सामान्य मान्यतांच्या आधारे लिहिण्यात आली आहे. झी 24 त्याबाबतची हमी देत नाही.)