Surya Grahan 2024 India Date And Time : ज्योतिष, विज्ञान असो किंवा धर्म यांच्या दृष्टिकोनातून ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात तिला अशुभ मानलं जातं. या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण झालं. आता येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजे सर्वपित्री अमावस्येला या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण असणार आहे. धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात खाणे, पिणे आणि शुभ कार्याबद्दल अनेक नियम सांगण्यात आलंय. खास करुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात अनेक नियम सांगण्यात आलंय. सूर्यग्रहणाच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार सुतक काळ पाळला जातो. 


सुतक कालावधी कधी सुरू होतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुतक काळ सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. या काळात काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घ्या.


काय करावे आणि काय करू नये ?
 या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 9:13 वाजता सुरू होणार असून 3 ऑक्टोबरला पहाटे 3:17 वाजेपर्यंत असणार आहे. 


दान करा 


हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व दिले गेलंय. त्यामुळे सूर्यग्रहण काळात दान करणे खूप शुभ मानलं जातं. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. 


मंत्र जप
 
सूर्यग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. ग्रहणकाळात देवाची मनोभावे पूजा करावी.
 
आंघोळ करावी 
 
सूर्यग्रहणानंतर स्नान करावे. तसंच ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करावे.


धार्मिक शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये, अशी मान्यता आहे. 


सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका. तसंच सूर्यग्रहण काळात अन्न खाणे टाळावे. सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडू नयेत. 


गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
 
धार्मिक मान्यतांनुसार ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव फक्त गर्भवती महिलांवरच होतो. त्यामुळे गरोदर महिलांना ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरू नयेत. चांगली पुस्तके वाचून देवाची पूजा करता येते. ग्रहण काळात सुई काढण्यास मनाई आहे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये. 


धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण म्हणजे काय?
 
धार्मिक ग्रंथानुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी राहू सूर्याला गिळतो. असे म्हणतात की या काळात सूर्य संकटात असतो आणि ग्रहण होते. पण राहुला धड नसल्यामुळे सूर्य थोड्याच वेळात पूर्वपदावर येतो. सूर्य त्याच्या मूळ स्थितीत येताच ग्रहण समाप्त होतं अशी मान्यता आहे. 


वैज्ञानिकदृष्ट्या सूर्यग्रहण म्हणजे काय?
 
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे असलेली सूर्याची प्रतिमा तात्पुरती अस्पष्ट होते. त्यामुळे काही क्षण सूर्यप्रकाश पृथ्वीवर नीट पोहोचत नाही आणि अंधार पसरतो. या घटनेला सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. 


सूर्यग्रहण कुठे दिसणार?


कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचे दक्षिण भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि न्यूझीलंड, फिजी इत्यादी देशांमध्ये काही काळ दिसणार आहे. त्यात चिली, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, पेरू, न्यूझीलंड आणि फिजी या ठिकाणी काही काळापूरता दिसेल. कंकणाकृती सूर्यग्रहण हे दक्षिण चिली आणि दक्षिण अर्जेंटिनामध्ये दिसेल. भारतात कुठेही सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी देखील पाळला जाणार नाही.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)