Surya Grahan 2023 : आज सर्वपित्री अमावस्येला या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण आज असून ते भारतात दिसणार नाही. तसंच आज शनि अमावस्यादेखील आहे. तब्बल 100 वर्षांनी शनि अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणासोबत शनि अमावस्येचा हा योगायोग अतिशय शुभ मानला गेला आहे. शनिदेवाच्या कृपेने काही राशींच्या लोकांच्या संपत्ती वाढ होणार आहे. (Solar eclipse after 100 years on Shani Amavasya wealth of these zodiac signs people will increase )


'या' राशी ठरणार नशीबवान !


मेष (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण या दुर्मिळ संयोगामुळे या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होणार आहे. यांना अचानक धनलाभ होणार आहे. त्यांच्या संपत्ती वाढ होणार आहे. व्यावसायिकांसाठीही जीवनातही प्रगती घेऊन येणार आहे. या लोकांना कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य लाभणार आहे. नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


सुद्धा वाचा - Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम


मिथुन (Gemini Zodiac) 


सूर्यग्रहणावर शनि अमावस्येचा योग जुळून आल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळेल.


हेसुद्धा वाचा - Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचा सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर पाहता येणार का? वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स


कुंभ (Aquarius Zodiac) 


सूर्यग्रहणात शनि अमावस्येचा योग जुळून आल्याने कुंभ राशीच्या लोकांना अमाप संतत्ती मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदीची बातमी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)