Surya Grahan 2024 : धार्मिक ग्रंथानुसार फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्याला भूतडी अमावस्या असं म्हटलं जातं. हिंदू वर्षातील ही शेवटची अमावस्या 8 एप्रिल 2024 सोमवारी असणार आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. यंदा सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. यादिवशी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग अतिशय दुर्मिळ असून भूतडी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा योग अतिशय घातक आहे. हा घातक संयोग काही राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरणार आहे. (Somvati Amavasya 2024 Harmful conjunction of Surya Grahan on bhutadi Amavasya impact these zodiac signs)


भूतडी अमावस्याला काय होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रज्ञांनुसार या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ वैध नसणार आहे. तब्बल 50 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार भूताडी अमावस्येला भूतांचा प्रभाव प्रबळ असतो असं म्हणतात. 


कोणाला काळजी घ्यावी लागेल?


ज्योतिषांच्यानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहण दोष असेल त्या लोकांना अधिक सावध राहण्याची गरज आहे. सूर्य आणि चंद्रासोबत राहू किंवा केतूचा संयोग झाल्यास कुंडलीत ग्रहण दोष तयार होऊ शकतो. 


'या' राशीच्या लोकांनीही काळजी घ्यावी!


मेष रास (Aries Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आणि भूताडी अमावस्या घातक ठरणार आहे. तुमच्या करिअर किंवा व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. तुम्हाला अचानक नुकसान होणार आहे. तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होणार आहात. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


कर्क राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप जास्त त्रासदायक ठरणार आहे. अचानक तुमच्या प्रियजनांकडून तुमचा विश्वासघात होणार असल्याने तुम्ही तुटणार आहात. नात्यात दुरावाही निर्माण होणार आहे. त्यामुळे यादिवशी वाणीवर नियंत्रण ठेवा. विनाकारण कोणाशीही वाद करु नका. 


तूळ रास (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण वाईट ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं नुकसान होणार आहे.  त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  


या वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांना थोडे सावध राहावं लागणार आहे. तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागणार आहे. कठीण प्रसंगातून तुम्हाला जावं लागणार आहे. 


मीन रास (Pisces Zodiac)  


या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मीन राशीत होणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या करिअरमध्येही अचानक बदल होणार आहे. त्यामुळे करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)