मेष - व्यवसायासाठी दिवस ठिक नाही. कोणालाही उधार देण्यापूर्वी विचार करा. काही जुन्या गोष्टींमुळे चिंतेत राहाल. नोकरदार वर्गाने सावध राहा. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मन विचलित होण्याची शक्यता आहे. शांत राहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल. याचा फायदाच होण्याची शक्यता आहे. पुढील योजना आखू शकता. मित्रपरिवार आणि कुटुंबाची साथ मिळेल. 


मिथुन - व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. इतरांशी चांगलं बोलून तुमची कामं पूर्ण करुन घेऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या. अन्यथा त्रास होण्याची शक्यता आहे.


कर्क - कामाच्या ठिकाणी काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. त्यामुळे चिडचिड होईल. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज असतील. दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतील. कोणावर अवलंबून राहू नका. 


सिंह - आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही इतरांना प्रभावित करु शकता. तुमचा विचार करण्याचा दृष्टीकोन इतरांच्या पसंतीस उतरेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्यांचा इतरांना फायदा होऊ शकतो. तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.


कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्थिती संतुलित असेल. कौटुंबीक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. काही महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. करिअर आणि गुंतवणूकीच्या काही नव्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. पैसे आणि खर्चाकडे लक्ष द्या.


तुळ - मेहनत करा, यश मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची संधी आहे. कोणतीही संधी घालवू नका. जे काम हाती घ्याल त्यात इतरांची अपेक्षित मदत होईल. आरोग्य सर्वसामान्य असेल. 


वृश्चिक - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कायदेशीर गोष्टींमध्ये अडकण्यापासून दूर राहा. वेळेला महत्त्व द्या. काही खास कामांमध्ये जास्त परिश्रम घ्यावे लागतील. कोणत्याही घटनेवर लगेच निर्णय घेऊ नका. थकवा जाणवू शकतो.


धनु - गुंतवणूक करताना विचार करुनच पुढे जा. ज्या व्यक्ती तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्याच व्यक्तींकडून काही अडचणी उभ्या केल्या जाऊ शकतात. कामं पूर्ण न झाल्यास निराश होऊ नका, अधिक विचार करु नका.


मकर - दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहाराच्या मुद्द्यावरुन वाद होतील. नवी जबाबदारी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. 


  


कुंभ - करिअरच्या दृष्टीने शुभवार्ता कळेल. जुने वाद संपू शकतात. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. गुंतागुंत सुटेल. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 


मीन - करिअरच्या दृष्टीने निर्णय घेताना सावध राहा. काळजी करु नका. स्वत:कडे लक्ष द्या. विचारपूर्वक गुंतवणूक करा. कामात चुका होण्याची शक्यता आहे. लहानमोठ्या अडचणी येऊ शकतात.