मेष- चांगली बातमी कानावर पडल्यामुळे दिवस चांगला जाईल. अचानक धनलाभ संभवतो. कामाची प्रशंसा होईल. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- योग्य आर्थिक सल्ला देणाऱ्या व्यक्तीशी भेट होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची नवी संधी दृष्टीपथात येईल. जोडीदारामुळे मानसिक धैर्य उंचावेल.


मिथुन- कोणताही व्यवहार करताना शांतपणे निर्णय घ्या. नव्या लोकांशी संपर्क वाढवा. आजचा दिवस मौजमजेत जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. एखादे महत्त्वाचे काम तुर्तास पुढे ढकला.


कर्क- शांतपणे सारासार विचार केल्यास पैसे कमावण्याचे नवे मार्ग शोधता येतील. नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होतील. काही नवे प्रस्ताव समोर येतील. 


सिंह- प्रिय व्यक्ती आणि नातेवाईकांशी असलेले संबंध आणखी दृढ होतील. कुटुंबातील तुमची भूमिका बदलू शकते. जोडीदार आणि जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. सभोवताली सुरु असणाऱ्या धार्मिक किंवा राजकीय घटनांचा फायदा होईल. 


कन्या- एखाद्या नव्या कामाचा प्रारंभ कराल. नोकरीत तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाईल. बाहेरगावी जायला मिळेल. वाहन आणि घर खरेदीसाठी चांगला योग.


तूळ- आव्हानांचा सामना करताना काही नव्या गोष्टी शिकायला मिळतील. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. 


वृश्चिक- धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. थोडा संयम बाळगाल, तर समस्या आपोआप सुटतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. 


धनु- नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. वास्तुयोग संभवतो. इतरांना मदत कराल. बऱ्याच दिवसांपासून विचारात असलेल्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात कराल. 


मकर- आजचे ग्रहमान रंजक आणि नव्या संधी मिळण्याच्यादृष्टीने अनुकूल. आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करा. नकारात्मकतेला थारा देऊ नका. वेळ जाईल तशा काही समस्या आपोआप सुटतील. 


कुंभ- मुलांच्या शिक्षणाविषयी विचार कराल. सकारात्मक राहिलात तर दिवस चांगला जाईल. आगामी काळात नव्या संधी चालून येण्याची शक्यता. जपून बोला, लोकांचे गैरसमज होण्याची शक्यता. 


मीन- जोडीदार आणि कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. बऱ्याच काळापासून प्रतीक्षा असलेले लोक भेटतील. एखाद्या प्रसंगामुळे विचार करायला प्रवृत्त व्हाल. आर्थिक लाभ किंवा नोकरीत बढती मिळण्याची शक्यता.